मुंबई उपनगरातील कबड्डी प्रतिभा विकसित करण्यासाठी आणि तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पोर्टवोट घेऊन येत आहे  ‘स्पोर्टवोट जिल्हा कबड्डी चॅम्पियनशिप’

महाराष्ट्रातील कबड्डीचा मोसम जोरात सुरू आहे.राज्यातील कबड्डी कम्युनिटीमध्ये प्रचंड उत्साहाचा वातावरण आहे, आणि  त्यांच्या त्याच उत्साहात भर घालत, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मार्ग दर्शनाखाली स्पोर्टवोट घेऊन येत आहेत ‘स्पोर्टवोट जिल्हा कबड्डी क्लब चॅम्पियनशिप’ ही भव्य कबड्डी स्पर्धा .

स्पोर्टवोट  जिल्हा कबड्डी क्लब चॅम्पियनशिप २१ जानेवारी ते २८ जानेवारी २०२३ या दरम्यान आयोजिली आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागातील खुल्या गटातील एकूण ६४   संघ, व पुरुष ‘अ’ गटातील २४ संघानी सहभाग घेतला आहे. ह्यात नामवंत संघ जसे कि अभिनव क्रीडा मंडळ, स्वस्तिक क्रीडा मंडळ, पार्ले स्पोर्ट्स क्लब ह्या सारख्या क्लब्स चा देखील समावेश आहे. ह्या चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या वाहिल्या हंगामात मुंबई उपनगरातील ११००+  उदयोन्मुख कबड्डी खेळाडूंना व्यासपीठ मिळणार आहे. स्पोर्टवोट ने ऑगस्ट २०२२ मध्ये मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या सहाय्याने महामुंबई कबड्डी लीगचेही सहआयोजकत्व केले होते. या लीगला कबड्डी समुदायाकडून प्रचंड यश आणि पाठिंबा मिळाला होता ज्यामुळे लीगमधील अनेक खेळाडूंनी मागील महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले.

महामुंबई कबड्डी लीगच्या घसघशीत यशानंतर, स्पोर्टवोटचा कबड्डीमध्ये स्पर्धा आयोजक म्हणून हा दुसरा उपक्रम आहे. स्पोर्टवोटचे CEO, श्री सिद्धांत अग्रवाल म्हणतात, “महामुंबई कबड्डी लीगची सहनिर्मिती करण्याचा आमचा अनुभव खरोखरच प्रेरणादायी होता. मुंबईतील इतक्या प्रतिभावंत  कबड्डीपटूंना आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकलो, हि आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आता, आम्हाला या स्थानिक कबड्डी खेळाडूंना सशक्त करण्यात आणि त्यांना संधी आणि जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यास मदत करणारी हि चॅम्पियनशिप हि दुसरी स्पर्धा घेऊन येणे आमच्या दृष्टीने अगदीच स्वाभाविक होतं . मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनशी आमचा दीर्घकाळ संबंध आहे आणि मुंबई उपनगरांपासून सुरू करत अवघ्या महाराष्ट्रभरातील  कबड्डीला सक्षम बनवण्याच्या या प्रवासात त्यांचा पाठिंबा मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आम्ही काही उत्कृष्ट कबड्डी ऍक्शन आणि काही अचंबित करणाऱ्या  ऍथलीट्सच्या शोधार्थ हा संपूर्ण घाट घातला आहे आणि मुंबईतलंन कबड्डी वलय आम्हला निराश करणार नाही ह्याची आम्हाला १००% खात्री आहे.”

या स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील काही सर्वोत्तम संघ आणि क्लब सहभागी झाले आहेत, ज्यामध्ये मुंबईतील अभिषेक नर, भरत करंगुटकर, आशिष मोहिते, आकाश अरसुल, सायली जाधव आणि असे  अनेक होतकरू आणि प्रचलित खेळाडू आपले कौशल्य जगासमोर दाखव्हायला सज्ज झाले आहेत. संपूर्ण स्पर्धेचे डिजिटायझेशन केले जाणार असून आणि स्पोर्टवोट अॅपवर ह्या चॅम्पियनशिप चे थेट प्रक्षेपण प्रवाहित केले जाईल. स्पोर्टवोट जिल्हा कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल अधिक अद्यतनांसाठी संपर्कात रहा.

Share.

Leave A Reply