गोरेगाव येथे रंगलेल्या स्पोर्टवोट मुंबई सुबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिप च्या ८ व्या दिवशी पुरुष गटाच्या संघात उपांत्य फेरीत जागा पटकावण्याची लागली शर्यत. ब गटातील सन्मित्र क्रीडा मंडळाचा सोहम पुंडे हा तब्बल १४३ गन मिळवत ठरला आहे आत्ता पर्यंतचा सर्वोत्तम रायडर व ३० गन मिळवत सर्वोत्तम डिफेंडर ची जागा पटकावली श्री सिद्धी संघाच्या संजीत पंडित ने. त्याच प्रमाणे अ गट पुरुष विभागात अंबिका सेवा मंडळाचा शुभम दीडवाघ आणि चेंबूर क्रीडा संघाचा आकाश कदम ह्याने सर्वोत्तम रेंदेर ची जागा पटकावली असून दोघांमध्ये केवळ १५ गुणांची तफावत आहे. तसेच उत्कर्ष क्रीडा मंडालेच्या राहुल हेगडे आणि क्षितिज पाटील हे एक गुणांच्या बरोबरी वर अ गटातील सर्वोत्तम डिफेंडर च्या स्थानी उभे आहेत.

८ व्या दिवशी झालेल्या खेळ मध्ये अंबिका क्रीडा मंडळाने ३३ गुणांची चढत घेत पार्ले स्पोर्ट्स क्लब वर विजय मिळवला तर, चेंबूर क्रीडा मांडले २२ गुणांची चढत मिळवत सागर स्पोर्ट्स क्लबला मात दिली. परंतु ८ व्या दिवसातला सगळ्यात रोमांचक सामना ठरला तो म्हणजे संघर्ष क्रीडा मंडळ आणि सह्याद्री क्रीडा मंडळ ह्या संघांमध्ये. शेवटच्या क्षणपर्यांत एक एक गुणुनची बरोबरी करत दोन्ही संघ लढत होते परंतु शेवटच्या क्षणी राकेश कदम ह्यांच्या उत्तम खेळीने संघर्ष क्रीडा मंडळाला एका गुणाने विजय मिळवून दिला आणि उपांत्य फेरीत प्रवेश देखील मिळवून दिला .

स्पोर्टवोत मुंबई सुबर्ब कबड्डी चम्प्यानशिपच्या अंतिम दिवशी पुरुष संघाचे दोन्ही गटातील उपांत्यपूर्व फेरीतील, उपांत्य फेरीतील सामने आणि महाअंतिम सामना रंगणार आहे. मुंबई उपनगरतील हि कबड्डी चॅम्पियनशिप स्पोर्टवोट आणि DS3 स्पोर्ट्स क्लब आयोजित करीत आहेत आणि विजेटये संघ सहित सर्वोत्तम रेंदेर, सर्वोत्तम डिफेंडर ह्यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे . चंप्यानशिप च्या अंतिम दिवसाकडे संपूर्ण मुंबई उपनगर कबड्डी विश्वाचे लक्ष्य लागले आहे आणि हि स्पर्धा स्पोर्टवोट ह्या अँप वर लाईव्ह प्रक्षेपित होत आहे.

Score Card –
Ambika Krida Mandal 61 VS Parle Sports Club 34
Ovali Krida Mandal 30 VS Amarjot Krida Mandal 26
Shree Sai Sports Club 31 VS Dutta Seva Krida Mandal 18
Chembur Krida Mandal 55 VS Sagar Sports Club 33
Sangharsh Krida Mandal 28 VS Sahyadri Krida Mandal 27
Shree Siddhi Sangh 38 vs Sangharsh Krida Mandal 31

Share.

Leave A Reply