‘मुंबई उपनगरातील गुणवंत कबड्डी खेळाडूंना त्यांचा खेळ जगाला दाखवण्याची सुवर्ण संधी देणार्‍या कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पाहिल्या दिवशी झाले 12 सामने’

मुंबई, 23 जानेवारी: 2023 सालची दणक्यात सुरुवात करत स्पोर्टवोटने जाहीर केली स्पोर्टवोट मुंबई सबर्ब कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेचा पहिला यशस्वी रित्या पार पडला. ही कबड्डी चॅम्पियनशिप, मुंबई गोरेगाव येथे 21 जानेवारी 2023 ला सुरू झाली.

स्पर्धेच्या पाहिल्याच A गटाच्या पुरूष सामन्यात श्री साई क्रिडा मंडळ मालाड ह्यांनी नव एकता क्रिडा मंडळ सांताक्रूझ ह्यांना तब्बल 17 गुणांनी मात देत स्पर्धेचा श्री गणेशा केला. तर दुसर्‍या सामन्यात शिवाजी क्रीडा मंडळ सांताक्रूझ ह्यांना क्षणभर देखील खेळाची पकड न मिळवू देता अजित सुंदर स्पोर्ट्स क्लब बोरिवलीने तब्बल 55 गुणांनी मात दिली. ह्या दोन सामन्यांमध्ये श्री साई क्रिडा मंडळचे प्रथमेश कुंभार आणि अजीज सुंदर स्पोर्ट्स क्लबचे रोहित नवले ह्यांना ‘प्लेयर ऑफ द मॅच ‘ देण्यात आला. श्री साई स्पोर्ट्स क्लब भांडुप संघाने अभिनव क्रिडा मंडळ घाटकोपर चा 32 गुणांनी यशस्वी पराभव केला. पहिल्या दिवसाचा सगळ्यात रोमांचक सामना रंगला तो म्हणजे नेताजी सुभाष क्रिडा मंडळ आणि श्री साई क्रीडा मंडळ मालाड ह्या दोन संघांमध्ये. शेवटापर्यंत एक-एक गुणांची टक्कर देत दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी लढत होते परंतु अंतिम क्षणी 2 गुणांची चढत मिळवत नेताजी सुभाष क्रिडा मंडळाने विजय प्राप्त केला. ह्या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच ठरला नेताजी चा प्रतीक म्हात्रे.

स्पोर्टवोट मुंबई सबर्ब कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी एकूण 24 सामने आयोजिले असून महिला गटाचे 4 सामने रंगणार आहे. पाहिल्या दिवशी च्या खेळानंतर पराभूत झालेल्या शिवाजी क्रिडा मंडळ, कूणभी सेना क्रिडा मंडळ आणि शूर जवान क्रिडा मंडळ मुलुंड ह्या संघाना विजयाची आशा असेल.

स्पर्धेचे न्यूट्रिशन पार्टनर महल्ले ह्यांच्या कडून सर्व खेळाडूंना प्रोटिन बार देण्यात आले. त्याच प्रमाणे ही संपूर्ण स्पर्धा स्पोर्टवोट ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर लाईव्ह प्रक्षेपित होत आहे आणि सर्व खेळाडू आणि त्यांच्या संघांचे सर्व रेकॉर्ड ह्या अॅप वर मेन्टेन केले जात आहेत. ह्या भव्य कबड्डी स्पर्धेच्या अधिक माहिती साठी स्पोर्टवोट अँप ला भेट द्या.

Share.

Leave A Reply