Skip to content Skip to footer

स्पोर्टवोट मुंबई सबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिप च्या दुसऱ्या दिवशी रंगला मुंबई उपनगरातील गुणवंत कबड्डी पटुंमध्ये रोमांचक हंगाम

स्पोर्टवोट मुंबई सबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिप च्या दुसऱ्या दिवशी रंगला मुंबई उपनगरातील गुणवंत कबड्डी पटुंमध्ये रोमांचक हंगाम

गोरेगाव पु, येथे होणाऱ्या स्पोर्टवोट मुंबई सबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिप च्या दुसऱ्या दिवशी २१ सामने रंगले ज्यातून मुंबई उपनगरातील दर्जेदार खेळाडू झळकले जागतिक पटलावर

मुंबई, 23 जानेवारी: स्पोर्टवोट ने आयोजलेल्या ह्या कबड्डी चॅम्पिअनशिप स्पर्धेमध्ये पुरुष संघातील अ गट वा ब गट आणि खुला महिला संघ असे सगळे मिळून मुंबई उपनगरातील तब्बल ६४ संघ सामील आहेत. ह्या ६४ संघांमध्ये स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी २१ सामने रंगले व उपनगरातील होतकरू खेळाडू प्रेक्षकांच्या नजरेस पडले. दिवसाची सुरवात पुरुष संघातील सामान्यांनी झाली. संभाजी क्रीडा मंडळाने शिवाजी क्रीडा मंडळ संतकरूझ ह्यांच्या सातत्याने घाव घालत ऐतिहासिक अशी ५५ गुणांची चढाई करत दणक्यात विजय प्राप्त केला. संकेत केंबळे ह्या त्यांच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर समोरच्या संघास अजिबात चढाई करू दिली नाही आणि त्यानेच तो ठरले ह्या सामन्याचा ‘ प्लेअर ऑफ द मॅच’. संभाजी क्रीडा मंडळाच्या तोडीसतोड कामगिरी करत श्री सिद्धी क्रीडा मंडळाने तब्बल ४८ गुणांची चढाई करत गरुड झेप क्रीडा मंडळावरती विजय मिळवला. ह्या विजयाचा शिल्पकार झाला श्री सिद्धी क्रीडा मंडळाचे युवा खेळाडू संजीत पंडित. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिला संघांचा पहिला सामना रंगला तो म्हणजे संघर्ष क्रीडा मंडळ विरुद्ध भांडुप स्पोर्ट्स कळंब ह्या दोन संघांमध्ये. संघर्ष क्रीडा मंडळाने तन्वी परब हिच्या कौतुकास्पद कामगिरीच्या जोरावर आपल्या संघाला तब्बल ४४ गुणांनी विजय प्राप्त करून दिला तसेच महिला संघाच्या दुसऱ्या सामन्यात नयना झा ह्या युवतीने आपल्या खेळीने माउली प्रतिष्ठान संघाला महात्मा फुले संघाविरुद्ध विजय मिळवून दिले, त्यांचा उत्तम खेळासाठी त्या दोघी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ देखील ठरल्या.

स्पोर्टवोट मुंबई सुबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिपच्या तिसऱ्या दिवशी एकूण १४ सामने रंगणार असून उपांत्य आणि उपांत्य पूर्व फेरीत कोणता संघ प्रवेश करेल ह्या दृष्टीने हा महत्वाचा दिवस ठरणार आहे. स्पोर्टवोट हि संपूर्ण स्पर्धा मसल्ब्लेझ ह्या नुट्रीशन पार्टनरच्या साहाय्याने आयोजित करत आहे आणि हि संपूर्ण स्पर्धा स्पोर्टवोट अँप वर लाईव्ह प्रदर्शित होत आहे. स्पोर्टवोट मुंबई सुबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिपच्या सर्व मॅचेस , सर्व खेळाडूंचे प्रोफाईल्स स्पोर्टवोट अँप वर उपलब्ध आहेत.

Leave a comment