मुंबई उपनगर कबड्डी अससोसिएशन च्या साहाय्याने द्स३ स्पोर्ट्स कळंब स्पोर्टवोत आयोजित स्पोर्टवोट मुंबई सुबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिपची रंगत दिवसागणिक वाढत जाताना दिसली. संभाजी क्रीडा मंडळ ने ३८ गुणांनी अझीझ सुनंदार स्पोर्ट्स कळंब वर मात करत क्वालिफायर्स मध्ये प्रवेश मिळवला. त्याच सोबत नेताही सुभाष संघ , संघर्ष क्रीडा संघ ह्यांनी देखील क्वालिफायर्स मढी आपली जागा पक्की केली. पराभव पत्करून सुद्धा अझीझ सुंदर स्पोर्ट्स कळंब आटा पर्यंतच्या स्पर्धेत सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी च्या बळावर क्वालिफायर्स मध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे.

तिसऱ्या दिवशीच्या रंजक खेळाचे ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरले श्री साई स्पोर्ट्स क्लब चे प्रथमेश वैनगंकर . तसेच दत्तात्रय संघाला गरुड झेप क्रीडा मंडल विरुद्ध २९ गुणांचा विजय मिळवून देत प्रमुख खेळाडू ठरले शब्बीर शेख. ह्या दोघांसहित श्री सिद्धी संघाचे अर्शद चौधरी, गजानन क्रीडा मंडळाचे विकास हार्मले, दत्त सेवा मंडळाचे साहिल होडे, पार्ले महोत्सव चे अनिकेत सुकुम. सिद्धार्थ क्रीडा मंडळाचे आदित्य पवार आणि वंदे मातरम संघाचे अमित वंजारे हे प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरले.

स्पोर्टवोट मुंबई सुबर्ब कबड्डी चॅम्पिअनशिप च्या ४ दिवशी एकूण १४ सांबे आयोजिले आहेत आणि त्यातूनच क्वालिफायर्स मध्ये निवड होणाऱ्या उर्वरित संघांची नावे स्पष्ट होतील. आणि इतर संघांना पूर्व-क्वार्टरफायनल्स ला सामोरा जावा लागेल. हा सर्व रोमांचक कबड्डी हंगाम स्पोर्टवोट ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर लाईव्ह प्रक्षेपित होत आहे.

Share.

Leave A Reply