राजस्तरीय कबड्डी स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज चशल २०२३ चे प्रथम याच थेट प्रशक्षेपण होणार लाईव्ह स्पोर्टवोट अँप वर.

महाराष्ट्रातील कबड्डी समुदाय खूप मोठा आहे आणि आगामी काळ हा महाराष्ट्र कबड्डी साठी चा अत्यंत रोमांचक काळ असणार आहे कारण अनेक प्रमुख कबड्डी स्पर्धा येत्या काळात आयोजित केल्या आहेत. अशी च एक महत्वाची स्पर्धा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चषक २०२३ मार्चमध्ये नियोजित राज्यस्तरीय स्पर्धांसाठी सर्वाधिक प्रतीक्षेत असलेली एक स्पर्धा आहे, जी थेट जळगाव येथून ११ मार्च २०२३ पासून सुरू होणार आहे आणि १४ मार्च २०२३ पर्यंत आयोजिली आहे. ही स्पर्धा चार दिवस चालणारी असून या स्पर्धेत प्रत्येकी १६ पुरुष आणि महिला जिल्हा संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा तळागाळातील कबड्डी समुदायाला साजरी करण्यासाठी आणि महाराष्ट्रातून कबड्डी जगतातील पुढची मोठी प्रतिभा शोधण्यासाठी सज्ज आहे.

या स्पर्धेत अरकम शेख, रिशांक देवाडिगा, संकेत सावंत, आकाश शिंदे, अजिंक्य कापरे आणि आदित्य शिंदे यांसारखे प्रमुख पी.के.एल खेळाडूंचा समावेश होणार असून, ते त्यांच्या विशिष्ट जिल्हा संघांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय (महाराष्ट्र) यांच्या संलग्नतेने आयोजित केली गेली आहे आणि घोषणा झाल्यापासूनच या स्पर्धेने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अधिकृत डिजिटल भागीदार असलेल्या स्पोर्टवोट वर हि राज्यस्तरीय स्पर्धा एंड-टू-एंड डिजिटलाइज्ड आणि लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या सर्वात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा ,‘७० व्या महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिप’मध्ये मुंबई शहर संघाने ५-५ टायब्रेकर फेरीनंतर गोल्डन रेड फेरीत अहमदनगर संघाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराज चषक ही पुढील मोठी राज्यस्तरीय स्पर्धा असल्याने सर्व जिल्ह्यांचे विजेतेपद मिळवून महाराष्ट्रात चॅम्पियन होण्याचे ध्येय आहे.

१६ सहभागी संघांना पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागण्यात आले आहे. पुरुष गटातील उद्घाटन सामना अ गटातील टीम मुंबई शहर आणि टीम अमरावती यांच्यात रंगणार असून, महिला गटात टीम पुणे आणि टीम नागपूर यांच्यात खेळला जाईल. जळगावमधील लाइव्ह ऍक्शन पाहण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सर्वोत्तम कबड्डी टॅलेंटला पाठिंबा देण्यासाठी स्पोर्टवोट अँप फॉलो करा.

Share.

Leave A Reply